ई पोस्टर स्पर्धेत बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची मृण्मयी खानविलकर प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : 26 जानेवारी 2023 या 74 व्या भारतीय प्रजाकसत्ताक दिनानिमित्त इंडीयन असोसिएशन ऑफ फिजोओथेरेपीस्ट महिला, द्वारा आयोजीत केलेल्या ई पोस्टर स्पर्धेत कुडाळ येथील बॅ. नाथ पै फिजोओथेरेपी महाविदयालय कुडाळ येथील दुस-या वर्षातील विदयार्थीनी कु मृण्मयी शशिकांत खानविलकर हिने प्रथम पारितोषिक पटकाविले
सदर स्पर्धेचा विषय Re Create The Story of our freedom fighter (स्वातंत्र्य सैनिक ) In a Pictorial formet (सचित्र) स्वरुप ) हा होता. त्यामध्ये तिने क्रांतिवीर भगतसिंग यांच्या स्वातंत्र्य चळवळी ला चित्रात रुपातंर केले होते. या स्पर्धेसाठी कु. मृण्मयी खानविलकर हिला बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन, उमेश गाळवणकर बॅ. नाथ पै फिजोओथेरेपी महाविदयालय कुडाळचे प्राध्यापक डॉ सुरज शुक्ला व डॉ प्रगती शेटकर यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा तिन गटात होती. कनिष्ठ महाविदयालयचे विदयार्थी, फिजोओथेरेपी विदयार्थी व PG फिजीओथेरेपी UG विदयार्थी याच्यामध्ये घेण्यात आलेली होती.
सदरची स्पर्धा IAPWC ये राष्ट्रीय प्रमुख डॉ रूपी वर्शने (PT) क्षेत्रीय (ZONAL) प्रमुख डॉ पुजा कांबळे (PT) व महाराष्ट्र राज्य IAPWC संघाचे डॉ सुवर्णा गणविर (PT), डॉ स्नेहल पटेल (PT) डॉ उत्तरा मोहन (PT), डॉ प्रीया कारंडे (PT) व डॉ निराली संघवी (PT) द्वारा आयोति केलेली होती. मृणाली यांच्या या यशाबद्दल संस्थाचालक उमेश गाळवणकर ,प्रिन्सिपल डॉ सुरज शुक्ला व सहकाऱ्यांनी अभिनंदन केलेले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!