महिलांनी अत्याचार रोखण्यासाठी स्वतः आत्मनिर्भर बनले पाहिजे
सरपंच महेश गुरव यांचे प्रतिपादन
आशिये ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा;महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर
महिलांनी समाजात कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत.देशातील किरण बेदी, कल्पना चावला किंवा वायू वेगाने धावणाऱ्या पी. टी. उषा असतील,या महिलांनी समाजात आदर्श निर्माण कार्य करीत इतिहास रचला आहे.अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. दहावी, बारावी निकालातही मुलींची संख्या सर्वाधिक आहे.अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी स्वतः आत्मनिर्भर बनले पाहिजे,असे प्रतिपादन आशिये सरपंच महेश गुरव यांनी केले.
आशिये ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य शिबीर व मार्गदर्शन,पाककला स्पर्धा,गायन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण,डॉ.शमिता बिरमोळे,उपसरपंच संदीप जाधव , माजी सरपंच शंकर गुरव, ग्रामसेवक राकेश गोवळणकर ,सदस्य मानसी बाणे,दिपाली गुरव,विशाखा गुरव,पत्रकार भगवान लोके,संजय बाणे,सुहास गुरव, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा निधी पुजारे,ग्रा. प.कर्मचारी प्रिया कोरगावकर,दुर्वा गुरव आदीसह ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी विविध विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
सरपंच महेश गुरव म्हणाले,२१ व्या शतकाकडे आजची महिला वाटचाल करत आहे. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आजही परावलंबी भूमिका दिसून येत आहे.शासनाच्या विविध योजना महिलांच्या शिक्षणासाठी आहेत .त्यामुळे महिलांनी चांगले शिक्षण घेतलं पाहिजे. मुलगी शिकली.. प्रगती झाली या दृष्टीने सर्वांनी विचार केला पाहिजे. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलापेक्षा मुलगी देशाचा भवितव्य घडवणार आहे.आमच्या आयोजित कार्यक्रमांमध्ये गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
अत्याचार झाल्यास पोलीस पाठीशी राहतील – पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण
जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या गावात आज चागलं कार्यक्रम आयोजित केले आहेत.महिलाचा आजचा सुवर्ण दिवस आहे.कुठल्याही कामाला मागे पडू नका. महिलांनी काम करताना घाबरु नये, संकोच बाळगू नका.महिलांवर अत्याचार होत असतील तर आम्ही आपल्या पाठीशी आहोत.जीवनात कुठल्याही अमिषाला बळी पडू नका,असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी केले .
डॉ. शमिता बिरमोळे म्हणाल्या,महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.वयाच्या ३५ वर्ष झाल्यानंतर आरोग्याची तपासणी केली पाहिजे.
माजी सरपंच शंकर गुरव म्हणाले,महिला या स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात.स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण संसाराचा गाडा त्या महिलेवर अवलंबून असतो.आत्मनिर्भरतेने महिलांनी जीवन जगणे आवश्यक आहे.त्याला पुरुषांना नेहमी सहकार्य केलं पाहिजे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण,पत्रकार भगवान लोके,आशा सेविका गार्गी नेमळेकर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच आयोजित स्पर्धांमध्ये पाककला स्पर्धा प्रथम – सौ. प्रेरणा प्रकाश ठाकूर,द्वितीय – सौ. विनया प्रसाद खानोलकर, तृतीय – सौ. रसिका रविंद्र बाणे,उत्तेजनार्थ- सौ पल्लवी पुंडलिक बाणे,प्रांजल प्रभाकर बाणे तर रांगोळी स्पर्धा प्रथम – सौ पल्लवी पुंडलिक बाणे,द्वितीय -प्रांजल प्रभाकर बाणे तृतीय – सौ. तनया सुनिल बाणे व गायन स्पर्धा -प्रथम – सौ. पल्लवी पुंडलिक बाणे,द्वितीय. सौ. स्नेहल संदिप कासले, तृतीय – सौ. जागृती प्रशांत बाणे आणि संगीत खुर्ची स्पर्धा प्रथम – प्रतिक्षा प्रकाश पांचाळ,द्वितीय – दिव्या देवेंद्र पांचाळ,तृतीय- संजिवनी सुधाकर गुरव या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धांचे परीक्षण शिक्षिका अनघा लाड, शिक्षिका शिल्पा सावंत ,शिक्षिका नेहा मोरे तर सूत्रसंचालन शिक्षक
राजेंद्र जातेकर यांनी केले.
कणकवली प्रतिनिधी