“घरातून खेचून मारून टाकेन” या धमकी प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा!

आमदार वैभव नाईक यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

मालवण येथील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत आपल्या व आपल्या सहकारी पोलिसांसमोरच, नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकार्यांना एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन” अशी धमकी दिली. त्यामुळे याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्याकडे केली आहे. या निवेदनात नाईक यांनी म्हटले आहे, या आधी सुद्धा माझे काका कै. श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे. तेव्हा नारायण राणे हे तेरावे आरोपी होते, तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!