रक्षाबंधन निमित्त शिवडाव चिंच्याळवाडीच्या तरुणांनी केली श्रमदानातून साफसफाई.

परिसर स्वच्छ करीत झाडांना राखी बांधून घातला वेगळा आदर्श.
कणकवली/मयूर ठाकूर.
कणकवली येथील शिवडाव चिंचाळवाडी येथे राहत असलेल्या मुलांनी आज रक्षाबंधन अनोख्या पद्धतीत साजरे केले.सुरवतीला हरकुळ ते चिंचळवाडी लगतचा सर्व परिसर श्रमदनातून साफ केला.तसेच वाडीत देखील स्वछता मोहीम राबवून झाडांना राखी बांधली.सर्वांनी एकत्र येत रबविलेल्या या उपक्रमातून एकजुटीचे दर्शन झाले.तसेच झाडांना राखी बांधून या तरुणांनी एक वेगळा आदर्श घालून दिला.निसर्गाशी सुद्धा आपले रक्ताचे नाते आहे,निसर्गातून मिळणारा ऑक्सिजन आपल शरीर जिवंत ठेवत.तसेच परिसर स्वच्छ केल्याने मोकळ्या हवेचा आनंद घेता येतो.रोगराई नष्ट होते.रक्षाबंधनाच्या निमित्ताने अश्या प्रकारचा उपक्रम राबवून या तरुणांनी जणू सामाजिक प्रबोधन केले आहे त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.