क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई सिंधुदुर्ग विभाग अध्यक्षपदी सुर्यकांत घाडी याची फेरनिवड

उपाध्यक्ष पदी. मधुकर ता.घाडी तर सचिव पदीप्रदीप रा. घाडी याचीनिवड
आचरा–अर्जुन बापर्डेकर
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्ग विभागाची सन २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया रविवार १८ ऑगस्ट रोजी कणकवली येथे पार पडली. त्यानंतर नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी .सूर्यकांत म.घाडी (किंजवडे) याची फेरनिवड झाली. उपाध्यक्षपदी. मधुकर ता.घाडी (आकेरी -सावंतवाडी ) याची तर
सचिवपदी प्रदीप रा. घाडी (बागमळा-दहिबाव ) याचीनिवड झाली
ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निरीक्षक. सूर्यकांत म. घाडी (किंजवडे ) व मुंबई मध्यवर्ती सदस्य, पत्रकार विजय गांवकर (दिगवळे ) यांच्या निरीक्षणाखाली पार पडली.
निवडण्यात आलेलि इतर कार्यकारिणी सहसचिव बुधाजी का. घाडीगांवकर (सोनवडे ),खजिनदार -श्री.सुनील वा. गांवकर (सोनवडे ),
सदस्य - श्री.विलास गांवकर (कसवन ), श्री. विजय घाडी (कुवळे-भरणी ), श्री.अर्जुन बापर्डेकर (आचरा ), श्री. सदानंद घाडीगांवकर (हरकुळ बु.), श्री. सत्यवान घाडीगांवकर (सोनवडे ), श्री.उमेश घाडी (शिरगांव ), श्री.कैलास घाडीगांवकर (शिरवंडे ), श्री.उमेश घाडीगांवकर (युवा-राखीव -वागदे ), श्री. भिसाजी घाडी (जेष्ठ राखीव -वरवडे ), सौ.प्रीतम घाडीगांवकर (महीला राखीव -कळसुली ) यांची निवड करण्यात आली. तसेच मुंबई मध्यवर्ती कार्यकारी मंडळावर उर्वरित तीन सदस्यांमध्ये सहकार /कला व सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणारे सदस्य म्हणून पत्रकार विजय सा. गांवकर यांची निवड करण्यात आली.
तसेच मुंबई मध्यवर्ती कार्यकारीणी पदासाठी लक्ष्मण सं. घाडीगांवकर (वागदे ) यांची एकमताने निवड करण्यात आली. मुंबई मध्यवर्ती कार्यकारी मंडळावर दोन पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदीप रा. घाडी आणि विलास शं. गांवकर यांची निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग विभागाचे अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून माजी सैनिक दत्तगुरू गांवकर (कुपवडे ) यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग विभागाचे सल्लागार म्हणून आत्माराम सु. घाडीगांवकर (कळसुलकर गुरुजी ) यांची निवड करण्यात आली.