78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न

78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी लोकरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे निर्माते स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या पुतळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी पाककला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. प्राथमिक विभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं त्याचे उद्घाटन करण्यात आले. सन्माननीय महेशजी शेटे यांच्या साबा सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून प्रशाळेला अध्यायवत अशी संगणक लॅब उपलब्ध करून देण्यात आली आहे या लॅबचे उद्घाटन माजी सैनिक सन्माननीय श्रीकांत जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर प्रशाळेच्या एनसीसी विभागाच्या वतीने खारेपाटण बाजारपेठेत संचलन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली
प्रशालेच्या मैदानावरती खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.या ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक सन्माननीय श्रीकांत जाधव व खारेपाटण गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ .प्राची इस्वलकर मॅडम उपस्थित होत्या. सन्माननीय प्राची इस्वलकर मॅडम यांच्या शुभहस्ते सार्वजनिक ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी इयत्ता दहावी, इयत्ता बारावी व वरिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने व गोल्डन फ्रेंड्स सर्कल खरेपाटण यांच्यावतीने मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. यानंतर विविध देणगीदारांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. मोठ्या उत्साहामध्ये 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न झाला.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!