कणकवली नगरपंचायत च्या ध्वजारोहणाचा मान हळवल येथील सुभाष परब यांना

कणकवली नगरपंचायतचा सेवा निवृत्ती पर सन्मान

कणकवली नगरपंचायत मार्फत तीन दिवस हर घर तिरंगा उपक्रमातर्गत नगरपंचायत कार्यालया समोर ध्वजारोहण करण्यात येत आहे बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान नळ योजना विभागात कार्यरत असलेल्या सुभाष सीताराम परब यांना देण्यात आला होता. हळवल परबवाडी येथील रहिवासी असलेले सुभाष परब हे मागील 42 वर्षे नगरपंचायत कणकवली मध्ये कार्यरत आहेत येत्या काही काही दिवसात ते सेवा निवृत्त होणार आहेत त्यासाठी त्यांना ध्वजारोहण करण्याचा मान देऊन नगरपंचायतच्या वतीने सुभाष परब यांचा बहुमान करण्यात आला. या ध्वजारोहण प्रसंगी कणकवली नगरपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते सुभाष परब यांनी आपल्याला मिळालेल्या बहुमाना बद्धल कणकवली नगरपंचायत च्या सर्व माजी सरपंच नगराध्यक्ष तसेच नगरसेवक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!