स्वातंत्रदिनाच्या निमिताने नगरपंचायत कणकवली ने राबविले विविध उपक्रम
250 विद्यार्थ्यांनी साकारली वेशभूषा
जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देश भक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 वा वर्धापन दिन अंतर्गत राज्यात विविध उपक्रम/ कार्यक्रम राबविण्याचे शासनाने निश्चित केलेले आहे. सदर उपक्रमांर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत विविध शिबीरे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यास अनुसरून आज दिनांक 13/08/2024 रोजी कणकवली कॉलेज एच.पी.सी.एल. हॉल येथे माझी सैनिक सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम व वेषभूषा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, कणकवली कॉलेजचे प्राचार्य श्री.महालिंगे, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यपक श्री.कांबळे सर, माजी सैनिक श्री.संतोष वसंत मुसळे, श्री.बाळकृष्ण महादेव सावंत, श्री.अशोक रामचंद्र राणे, श्री.सिताराम गोपाळ कुडतरकर, श्री.हरिश्चंद्र सिताराम बाईत व श्री.आनंद पेडणेकर, विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षक, कणकवली कॉलेज शिक्षक, विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा नं.2, 3 व 5 चे शिक्षक, विद्यार्थी, एस.एम.हायस्कूलचे विद्यार्थी पालकवर्ग, बचत गट महिला, कणकवली नगरपंचायत अधिकारी / कर्मचारी व शहरातील नागरिक इत्यादी सर्व उपस्थित होते.
या दरम्यान माजी सैनिक यांचा शाल, श्रीफळ, चषक व पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच 250 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य सेनानी, थोर पुरूष इत्यांचे वेषभूषा सादर केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र गीत, समुहगान, वैयक्तिक व सामुहिक नृत्यकला सादर करण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम.प्रियांका सोनसूरकर व श्री.अमोल भोगले, यांनी केले. तर आभार श्रीम.ध्वजा उचले यांनी मानले व श्री.किशोर धुमाळे, श्री.सतिश कांबळे, श्री.विभव करंदीकर, श्री.सचिन नेरकर, श्रीम.रूचिता ताम्हणकर, श्रीम.निकिता पाटकर, श्रीम.ज्योती देऊलकर, श्रीम.अस्मिता चव्हाण, श्री.सुमित कुबल, श्री.प्रशांत राणे, श्री.संदिप मुसळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम केले. तसेच सदर कार्यक्रमा ठिकाणी फोटो काढून harghartiranga.com या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा व ‘’घरोघरी तिरंगा’’ या उपक्रमामध्ये कणकवली शहरातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उत्सफूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी