विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा करत काढली तिरंगा रॅली
वागदे डगळवाडी शाळेचा उपक्रम
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वागदे डंगळवाडी शाळेमध्ये , देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये,मोलाचे कार्य करणारे थोर हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिक यांची वेशभूषा करून शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली.
तसेच , विद्यार्थ्यांकडून तिरंगा प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली.
सदर कार्यक्रमास उपस्थित वागदे गावचे सरपंच श्री संदीप रमाकांत सावंत, तसेच श्री लक्ष्मण घाडीगावकर, वागदे ग्रामपंचायत , सदस्या सौ संजना गावडे, मुख्याध्यापक श्रीम .वेदिका विनोद चव्हाण, व सहकारी शिक्षिका श्रीम.आस्था अजय फोंडेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,पालक वर्ग, व ग्रामस्थ , उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी