कणकवली पंचायत समितीच्या वतीने तिरंगा रॅली

पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रॅलीत समावेश
घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम च्या जोरदार घोषणा देत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शहरातून काढलेल्या रॅली ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 9 ते 15 ऑगस्ट पर्यंत घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येत असून कणकवली पंचायत समितीने देखील यात हीहिरीने सहभाग घेतला. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली