युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भव्य सत्कार
विमान प्रवासासह ईस्रो सहल आणि लाखो रुपयाची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS-2024 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता.
STS- 2024 मधील जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर शिक्षण मंत्री, आमदार श्री नितेश राणे, निलेश सांबरे,अध्यक्ष जिजाऊ संस्था मा श्री समीर नलावडे, माजी नगराध्यक्ष कणकवली यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. यावेळी श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत, सौ संजना संदेश सावंत, विजय भोगटे , संजय सावंत, सुनिल घाडीगावकर, प्रफुल्ल काणेकर, गिल्बर्ट फर्नांडीस, महेश पालव, श्रीधर दळवी, उमेश केसरकर, वैष्णवी सुतार, मृगाली पालव, संतोष जाधव, शिवाजी पवार, महेंद्र सावंत, दामू सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
STS-2024 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना १८ जून ते २१ जून या कालावधीत विमानाने त्रिवेंद्रम (केरळ) येथे ईस्त्रो सहलीला नेण्यात आले होते तसेच २ री व ३ री मधील १० गुणवंत विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटर ची भेट घडविण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मेडल व सन्मान चिन्ह देऊन गोरविण्यात आले
तसेच इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील २५० विद्यार्थ्यांना रोख अडीज लाखाची रोख बक्षिसे, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
त्याचप्रमाणे यावेळी युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. माध्यमिक विभागातून
प्रविण प्रभाकर कुबल, रेकोबा विद्यालय, वायरी भूतनाथ, मालवण.
प्राथमिक विभागातून श्री विजय धर्मराज मस्के, तुळस, वेंगुर्ले यांना रोख रक्कम, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
श्री दिपक केसरकर, शिक्षणमंत्री यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आमदार नितेश राणे यांनी बोलताना संदेश सावंत यांच्या सारखे सहकारी लाभने अभिमानास्पद असल्याचे सांगताना संदेश सावंत २४ तास सामाजिक कार्यात मग्न असतात. स्वखर्चाने उपक्रम राबवितात त्याबद्दल गौरव केला.
जिजाऊ सामाजिक संस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश सांबरे यांच्या वतीने मोफत वह्या वाटप करण्यात आले.
युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण