विद्यामंदिर प्राथमिक विभागाची विद्यार्थीनी कुमारी ऋचा रुपेश परब हिचे डान्स स्पर्धेत उज्वल यश

कणकवली : विद्यामंदिर प्राथमिक विभागाची विद्यार्थीनी कुमारी ऋचा रुपेश परब हिने कुडाळ येथे झालेल्या सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून प्रशालेच्या यशात मानाचा तुरा खोपला आहे तिच्या या यशात तिच्या आईवडिलांचा फार मोठा वाटा आहे कुमारी ऋचा हिला नृत्याची आवड असल्याने या कलेत पारंगत होण्यासाठी तिने सतत सराव करून विविध स्पर्धेत मानाचे स्थान पटकावले आहे सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार ही जिल्ह्यातील बाल कलाकार घडविण्यात यशस्वी मानली गेलेली प्रथम दर्जाची संस्था या संस्थेचा लौकीक फार मोठा आहे अशा संस्थेची द्वितीय क्रमांकांची मानकरी कुमारी ऋचा रुपेश परब ठरलेली आहे त्याबद्दल तिचे विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक ‘ प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे .
कणकवली, प्रतिनिधी