१३ ऑगस्ट रोजी खारेपाटण महाविद्यालय येथे DLLE कार्यशाळेचे आयोजन
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, खारेपाटणचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण, येथे मंगळवार दि.13 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागच्या एक दिवसीय प्रथम सत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये DLLE विभागांअंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती, सामाजिक उपक्रम, पथनाट्य, व विविध स्पर्धा विषयी अशा विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.
यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या सन 2024 – 25 या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई विद्यापीठाने आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या सर्व विस्तारकार्य शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे करण्यात येत आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावे.
मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते 3 या वेळेत कार्यशाळा संपन्न होत असून मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील जिल्हा समन्वयक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कांबळे ए. डी.,खारेपाटण पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष श्री. प्रवीणजी लोकरे, उपाध्यक्ष श्री. रघुवीर राणे व सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत. खारेपाटण महाविद्यालयाचे विस्तारकार्य शिक्षक प्रा. गजानन व्हंकळी व सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण