गंगाराम बाणे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील आशिये-बाणेवाडी येथील रहिवाशी, जुने गिरणी कामगार गंगाराम यशवंत बाणे (वय 88) यांचे 8 ऑगस्ट रोजी दुपारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी आशीये येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.
रिक्षा व्यावसायिक यशवंत उर्फ पप्पू बाणे तसेच दै. तरुण भारत कणकवलीचे कर्मचारी रमाकांत बाणे यांचे ते वडील तर आशिये गावच्या माजी सरपंच रश्मी बाणे यांचे ते सासरे होत.
कणकवली प्रतिनिधी