विद्यामांदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पर्यावरण पूरक नागपंचमी प्रदर्शन

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पर्यावरण पुरक नागपंचमी प्रदर्शन उत्साहात भरविण्यात आले होते इंग्लिश स्कूलचे कला शिक्षक श्री गावकर सर यांनी कागदी डिझायन तयार करून विद्यार्थांचा सहभाग घेऊन लहान विद्यार्थांना कला अविष्कार दाखवून दिला तसेच पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थानी मातीपासून नाग मूर्ती तयार करून स्कूलमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले होते महाराष्ट्रातील महत्वाचा सण नागपंचमी या सणाचे संस्कृतिक महत्व विषद करून पर्याकरण पुरक सण कसे साजरे करावेत याचे महत्व विद्यार्थी व पालकांना पटवून दिले. या प्रदर्शनाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ राणे मॅडम व सहकारी शिक्षक यांनी नियोजन बद्ध करून विद्यार्थ्यांना नागपंचमी सणांचे संस्कृती मूल्य शिकविले. या वेळी विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर जेष्ठ शिक्षक श्री अच्यूतराव वणवे सर कला शिक्षक श्री प्रसाद राणेसर पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम यांनी प्रदर्शनांचा पहाणी करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री तवटे साहेब चेअरमन डॉ सौ साळुंखे मॅडम सचिन श्री वळंजू साहेब व सर्व पदाधिकारी यांनी या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून घडवून आणला.
कणकवली प्रतिनिधी