राष्ट्रवादीचे नवनियुक्त आमदार शिवाजीराव गरजे यांची जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतली भेट

जिल्हा राष्ट्रवादी तर्फे शिष्टमंडळासह दिल्या त्यांना शुभेच्छा
राष्ट्रवादी पक्षाचे विधानपरिषदेचे
नवनियुक्त आमदार शिवाजीराव गरजे यांना सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालया येथे शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब,सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर् ,जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे आदी उपस्थित होते.
आमदार शिवाजीराव गरजे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासित केले.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी