कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

नगरपंचायत कार्यालया बाहेर येत दिल्या जोरदार घोषणा

विविध मागण्या पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव , नगरविकास विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य नगरपरीषद संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक यांच्या समक्ष घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी दिड वर्ष झाला तरी होत नाही. या निषेधार्थ नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज कणकवली नगरपंचायत बाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन छेडले. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. पण त्याच बरोबर या राज्यातील ३७४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील १ लाख कर्मचाऱ्यांचा देखील आहे.
“यांची जर चिड आपल्याला नाही आली तर मग आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत असे समजले जाईल. या आंदोलनादरम्यान काही प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या यामध्ये १)सर्व जाती धर्माच्या सफाई कामगारांना वारसा हक्क, २)उद्घोषणे पुर्वी कायम आसलेल्या नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना कायम करणे.
३)१०:२०:३० आश्वासित प्रगती योजना,
४)२ वर्षांपासून प्रलंबित निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ निवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळावेत, ५)कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे निदान सध्या कायद्याने बंधनकारक किमान वेतन दर सहा महीन्यानी मिळणाऱ्या DA सह मिळावा.
६) नगरपरीषद, नगरपंचायतीच्या मस्टरवर २० वर्षा पूर्वी असून आसलेल्या अखेरच्या ७५ कर्मचाऱ्यांचे तात्काळ समावेशन करणे.
७)कागदावर असलेली घरकूल योजना प्रत्यक्षात उतरवणे,
८) वर्षानूवर्ष एकाच पदावर काम करणाऱ्या उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी
९) संवर्गातील कर्मचाऱ्यांना बदली पदोन्नतीसाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन कोणतीही अपेक्षा न करता मिळावे.
१०) स्वच्छता निरीक्षकांचे समावेशन , पदस्थापना तात्काळ करणे. तसेच स्वच्छता निरीक्षक पदाचा जाॅबचार्ट तयार करणे , अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या स्वच्छता निरीक्षकांना गट अ, ब स्तरातील नगरपरिषदे मध्ये संधी मिळावी,
११) २५ % कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या संवर्गातील पदांची भरती पात्रता यादीत असलेल्या कर्मचाऱ्यांची करतेवेळी विना अट करावी.
१२)३५+ अधिक वर्ष शासकिय सेवा देऊन आपल्या सेवा निवृत्ती नंतर वृद्धापकाळात जेंव्हा आपल्याच्याने कुठलीच श्रमाची कामे होणार नसल्याने अशा काळात मुख्य आधार असणारी जुनी पेन्शन योजना राजकारण्यांनी बंद पाडली असून ती पूर्ववत लागू करने.
या व ईतर मागण्या मिळवून घेण्यासाठी या आंदोलनात सर्वांनी हातभार लावल्याशिवाय, एकजुटीने लढा दिल्याशिवाय आपले पुढील आयुष्य आणि आयुष्याचा वृद्धापकाळ सुखात जाणार का? याचा सर्व कामगार कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
हे कामबंद आंदोलन दि. ६ ऑगस्ट २०२४ पासून सूरू. ७ ऑगस्ट २०२४ रोजी* नगरपालिका प्रशासन संचालनालय, बेलापूर, नवीमुंबई – ते – मंत्रालय, मुंबई लाॅंगमार्च.,
प्रदिर्घ काळापासून प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिड वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही तर
९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून प्राणांतीक आमरण उपोषणाला बसण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे विनोद सावंत, रवी म्हाडेश्वर, प्रदीप गायकवाड, मनोज धुमाळे, प्रशांत राणे, सतीश कांबळे आदि या आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांचा एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!