जिल्हास्तरीय “योगासन” स्पर्धेत कणकवलीतील “श्वेताज योगा क्लास” च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

🛑”आर्टिस्टिक सिंगल” या प्रकारात कु.अस्मि राव आणि कु.मीरा नवरे जिल्ह्यात प्रथम.
🛑अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तब्बल चार विद्यार्थ्यांची निवड.
सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएयेशन तसेच महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आणि ब्रिहान महाराष्ट्र योगा परिषद आयोजित “सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा 2024” च आयोजन दिनांक 27 जुलै आणि 28 जुलै रोजी ओरोस जिजामाता हॉस्पिटल हॉल सिंधुदुर्ग,ओरोस येथे करण्यात आल होत.
या स्पर्धेमध्ये कणकवली येथील प्रसिद्ध असलेल्या श्वेताज योगा क्लास च्या विद्यार्थ्यांनी मोठ यश संपादित केल आहे.यामध्ये “आर्टिस्टिक सिंगल” या प्रकारात मुलींच्या दहा ते चौदा वयोगटात कु.अस्मि सचिन राव प्रथम,चौदा ते अठरा वयोगटात कु.मीरा समीर नवरे प्रथम तर “ट्रॅडिशनल” या प्रकारात दहा ते चौदा वयोगटात कु.अस्मि सचिन राव तृतीय तसेच 14 ते 18 वयोगटात कु.हर्षिता सावंत द्वितीय,कु.मीरा समीर नवरे चतुर्थ आणि पाचवा क्रमांक कु.काव्या गवंडळकर या विद्यार्थिनीस मिळाला.
योग हा शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात फार महत्वाचा आहे.योग हि एक,मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठीची अद्भुत विद्या आहे.”श्वेताज योगा क्लासेस” च्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना या योगाच महत्व पटवून देऊन शिस्तबद्ध योग प्रशिक्षण दिल जात.
यापूर्वी देखील अनेक वेळा या क्लासेस चे विद्यार्थी विविध योग स्पर्धामध्ये झळकले आहेत.
नुकत्याच झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये वरील विदयार्थ्यांनी विशेष गुणांकन प्राप्त केल असून अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थांना “श्वेताज योगा क्लास” च्या प्रमुख आणि जिल्ह्यातील नामांकित “योग शिक्षिका” तसेच “योगा कोच” श्वेता गावडे यांच मोलाच मार्गदर्शन लाभल.
कणकवली/प्रतिनिधी.