वैभववाडी ठाकरे शिवसेना शहर प्रमुख शिवाजी राणे यांच्या सह अनेक कार्यकर्ते भाजपा मध्ये

आमदार नितेश राणे यांच्या वाभवे वैभववाडी तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश

आमदार राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले स्वागत

वैभववाडी ठाकरे शिवसेना चे शहरप्रमुख शिवाजी राणे, सुधाकर आत्माराम शिर्के, सुहास राणे, धनंजय राणे, हर्षल मोरे, सुनील मोरे, समाधान रावराणे यांनी आमदार नितेश राणे, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, नासीर काझी, प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, अरविंदराव राणे, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, जयंत रावराणे, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

वैभववाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!