सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला झालेल्या दंडाबाबत शिवसेना आक्रमक
शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात ६ ऑगस्ट रोजी शिवसेना करणार आंदोलन
आमदार वैभव नाईक यांची माहिती
शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. शिंदे -फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. मंगळवार दि. ०६/०८/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे हे आंदोलन होणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
कणकवली, प्रतिनिधी