बाळू माने मित्रमंडळ MHO7 या गृपचा एक अनोखा उपक्रम

जुन्या मित्र परिवारातर्फे आयोजित केले रक्तदान शिबिर

देशासाठी ज्या महामानवांनी क्रांतिकारकांनी जीवनाचे योगदान बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले सर्व जुने मित्र परिवाराच्या माध्यमातून एकत्रित करून समाजासाठी व आपल्या जिल्ह्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या करिता मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणामध्ये अग्रेसर पणे भाग घेऊन सर्वसामान्य जनतेच्या गरजा ओळखून अशा उपक्रमांना सुरुवात केली आहे त्यासाठी ग्रुप मधल्या सदस्यांचा उस्फूर्तपणे पाठिंबा मिळाला. या रक्तदान शिबिरामध्ये नेपाळ मधील सुजन घीमिरे यांनी पण रक्तदान केले आहे.या ग्रुपच्या माध्यमातून एक नवीन चळवळ उभी होत आहे. त्याच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत.एक महिन्यापूर्वी एका मुलीला आर्थिक मदतिची गरज होती ती उभी करून गोवा बांबुळी हॉस्पिटलमध्ये नेऊन देण्यात आली होती. अशा वेगवेगळ्या उपक्रमामुळे बाळू माने मित्र मंडळाचे सगळीकडे कौतुक होत आहे. या प्रसंगी श्री. बाळू माने यांनी सर्व रक्तदाते यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!