लाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थ्यांनी अर्ज सादर करा

मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांचे आवाहन

कणकवली नगरपंचायत हद्दीतील लाडकी बहिण योजनेत येणा-या सर्व पात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, सर्वांनी आपला परिपूर्ण विहित अर्ज आवश्यक कागदपत्रासह कणकवली नगर पंचायत कार्यालयात जमा करावा. यापूर्वी जरी आपण ऑनलाईन अर्ज भरला असल्यास हा अर्ज कागदपत्रासह जमा करणे आवश्यक आहे जेणेकरून अर्जाची तपासणी करून पात्र लाभार्थ्याची यादी तयार करता येईल. आपण सादर केलेले ऑनलाईन अर्ज न.प. कार्यालयात तपासणीसाठी आढळून आले नाही किवां अपूर्ण अर्ज असल्यास तो परिपूर्ण करण्यासाठी तात्काळ कार्यालयात हजर राहून पूर्तता करून घ्यावी. यांची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी केले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!