आचरा पोलीसांची सहह्दयता

नुकसान ग्रस्त कुटूंबाला दिला मदतीचा हात

सोमवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्रिंबक पळसंब परीसरात हाहाकार उडविला यात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने आचरा कणकवली रोड काही काळ बंद होता. यात त्रिंबक साटमवाडी येथील तारामती गावडे यांच्या मातीच्या घराचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक महेश देसाई ,पोलीस हवालदार मिलिंद परब यांनी तातडीने धाव घेत आपदग्रस्त गावडे कुटूंबाला रोख मदत देत मदतीचा आधार दिला. यावेळी पळसंब सरपंच महेश वरक,पोलीस पाटील सिताराम सकपाळ,यांसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सोमवारी सायंकाळी काही क्षणापूरताच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पळसंब वायंगणकर वाडी पळसंब खालची वाडी येथे जोरदार फटका बसला. याभागात अनेक ठिकाणी झाडे, विद्यूत पोल मोडून पडले होते. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने बंद पडलेला आचरा कणकवली रस्ता रात्री उशिरा सुरळीत होण्यास मदत मिळाली.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!