कोकण रेल्वेची सुरू झालेली वाहतूक पुन्हा ठप्प

पेडणे येथील रेल्वे बोगद्यातील ट्रॅकवर पुन्हा माती व पाणी

काही रेल्वे रद्द तर काहींचे मार्ग बदलले

कोकण रेल्वे मार्गावर पेडणे बोगदामध्ये माती व पाणी रेल्वे ट्रॅक वर आल्याने ठप्प झालेली रेल्वे वाहतूक काल 9 जुलै रोजी रात्री उशिरा सुरू झाल्यानंतर पुन्हा आज आज 10 जुलै रोजी आज पहाटे कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्या मध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे.यामुळे मुंबई तून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही ट्रेन्स चे मार्ग बदलण्यात येत आहेत. अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी, सचिन देसाई यांनी दिली. या मुळे मात्र कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची मोठे हाल झाले आहेत. रेल्वे बाबत माहिती मिळावी या प्रवाशांच्या सुविधेकरिता खालील फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
BSNL number
0832-2706480
या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!