श्री देव रामेश्वर – नारायण पालखी सोहळ्यात वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन

मालवण येथील नागरिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
ढोल ताशाच्या गजरात, गुलाल अन फुलांची उधळण करत, फटक्याची आतषबाजीत मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बुधवारी भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. या पालखी सोहळ्याला कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच ऐतिहासिक श्री मोरयाचा धोंडा याचेही दर्शन घेतले. त्याचबरोबर वैभव नाईक यांनी मालवण येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, मनोज मोंडकर, तपस्वी मयेकर, अक्षय गावकर, हेमंत मोंडकर, किरण वाळके, चिंतामणी मयेकर, उमेश मांजरेकर,अनंत पाटकर, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, आयवान फर्नांडिस, राहूल सावंत, करण खडपे, बाबू राणे, सुरेश माडये आदीसह शिवसैनिक व मालवण वासीय उपस्थित होते.





