लक्ष्मीपूजनानिमित्त वैभव नाईक यांनी कुडाळ येथे विविध ठिकाणी दिल्या भेटी

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काल कुडाळ येथे लक्ष्मीपूजनानिमित्त विविध ठिकाणी भेट देऊन दर्शन घेत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्नील शिंदे, सागर भोगटे, गुरु गडकर, अमित राणे, विनय पालकर, संतोष अडूळकर, नितीन सावंत, दीपक सावंत, रमेश हरमलकर, विनोद शिरसाट, धीरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.





