माजगाव जि. प. शाळा नं. ५ येथे वाचन प्रेरणा दिन

डॉ. ए . पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त जि .प . प्राथमिक शाळा माजगाव नं. ५ या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
डॉ. ए . पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापिका श्रीम. दळवी मॅडम तसेच उपशिक्षिका श्रीम. मिलन पेडणेकर यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. शाळेमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. काही विद्यार्थांनी इंग्रजी पुस्तकांतील उताऱ्यांचे वाचन केले व खऱ्या अर्थाने डॉ. ए .पी . जे अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली. उत्कृष्ट वाचक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!