सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव यांना शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित

ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स या संस्थेच्या वतीने देण्यात आला पुरस्कार

ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य अजय भिकाजी जाधव यांना सामाजिक कार्याबद्दल “शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले. समाजकारण, शिक्षण, सामाजिक कार्य, आणि मानवसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. या कार्यक्रमास संतोष चौधरी (दादुस) यांची उपस्थिती होती. समाजामध्ये केलेल्या विविध कार्याचा गौरव करत हा पुरस्कार अजय जाधव यांना प्रदान करण्यात आला.

error: Content is protected !!