पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2025 रोजी कुणकेश्वर मंदिरात “पालकमंत्री चषक 2025” तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन.

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि श्री.देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चे आयोजन.

आठही तालुक्यात संपन्न होणार “पालकमंत्री चषक 2025” भजन स्पर्धा -बुवा श्री.संतोष कानडे यांची माहिती.

कणकवली/मयूर ठाकूर भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या आयोजनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आठही तालुक्यांमध्ये “पालकमंत्री चषक 2025″ तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या भजन स्पर्धांचे प्रथम पुष्प देवगड तालुक्यामध्ये संपन्न होत आहे.या भजन स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते देवगड कुणकेश्वर मंदिर येथे रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे.या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10023/-,द्वितीय पारितोषिक 5023/-,तृतीय पारितोषिक 3023/-,उत्तेजनार्थ पारितोषिक 2023/- तसेच गायक,वादक,तबला आणि कोरस यांसाठी प्रत्येकी 1023/- अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक देखील देण्यात येणार असून कोकण नाऊ चॅनेल च्या you ट्यूब चॅनेल वर तसेच देवगड तालुक्यातील केबल नेटवर्क च्या tv चॅनेलवर स्पर्धेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनी केले आहे.
देवगड तालुक्यातील “पालकमंत्री चषक 2025″या भजन स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री.देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!