‘रणझुंजार,च्या नरकासुर वध स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद

लोकराजा मित्रमंडळ येऊडीयेवाडी यांना पहिला क्रमांक
रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर नरकासूर वध स्पर्धेला स्पर्धक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मान लोकराजा मित्रमंडळ येऊडीयेवाडी यांनी पटकावला. त्यांना रोख रक्कम १२०००/- व चषक देऊन गौरविण्यात आले.
रणझुंजार मित्र मंडळ नेरूर व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर नरकासूर वध स्पर्धेचे उद्घाटन दाजी गावडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत नेरूर पंचक्रोशीतील तब्बल सात संघानी सहभाग घेतला. या स्पर्धेत लोकराजा मित्र मंडळ येऊडीयेवाडी, रंगश्री ट्रिकसीन ग्रुप नेरूर देसाईवाडी, ओम शिवकृपा कला क्रीडा मंडळ नेरूर देऊळवाडी, साई हनुमान रेवटीवाडी वालावल, साऊळवाडी मित्र मंडळ नेरूर साऊळवाडी, साई कलेश्वर मित्रमंडळ नेरूर, ब्राह्मण देव मित्र मंडळ नेरूर अशा सात संघानी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम १२०००/- व चषक लोकराजा मित्रमंडळ येऊडीयेवाडी यांनी पटकाविले. तर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 7000/- व चषक ओम शिव कृपा कला क्रीडा मंडळ नेरुर देऊळवाडी, तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 4000/- व चषक रंगश्री ट्रीकसीन ग्रुप नेरूर देसाईवाडी यांनी पटकाविले. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम रुपये ३०००/- व चषक श्री ब्राह्मण देव मित्र मंडळ नेरूर यांनी पटकाविले. या स्पर्धेत सहभागी श्री साई हनुमान रेवटीवाडी वालावल, साऊळवाडी मित्रमंडळ नेरूर साऊळवाडी, श्री साई कलेश्वर मित्रमंडळ नेरूर या संघास मानधन म्हणून रोख रक्कम रुपये २०००/- व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत दाजी गावडे यांनी उद्योजक रुपेश पावसकर यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उद्योजक रुपेश पावसकर यांनी नेरूर गावात कला जोपासण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे चारुदत्त देसाई देवस्थान स्थानिक सल्लागार कमिटी अध्यक्ष तथा माजी सरपंच यांनी नेरुर गावात प्रथमच अशी स्पर्धा घेण्यात आली व कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याची सुवर्णसंधी उद्योजक रुपेश पावसकर यांनी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे भविष्यात स्पर्धा होतच राहतील परंतु इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीप्रमाणे नेरूर गावात देखील अशाप्रकारे गर्दी होऊ शकते हे रुपेश पावसकर यांनी सिद्ध करून दाखवले अशा शब्दात श्री. देसाई यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे नेरूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर यांनी आपल्या मनोगतात उद्योजक रुपेश पावसकर हे सतत शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या मित्र मंडळाच्या माध्यमातून राबवत असतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद व आदर्शवत आहे असे सांगितले.
उद्योजक रुपेश पावसकर म्हणाले, स्पर्धा या भविष्यात होत राहतील या बद्दल तीळमात्र शंका नाही. याठिकाणी निवेदक निलेश गुरव यांनी स्पर्धेच्या नियम व अटींसह आपल्या निदर्शनास आणून दिले की, नरकासुर वध स्पर्धा या शहरामध्ये होत असतात. परंतु त्या आपल्या गावामध्ये होणे आवश्यक आहे. त्यावेळी मी त्यांना शब्द दिला की स्पर्धा आपण घेऊ, परंतु आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपणास स्पर्धा कशी घ्यावी याच्या रूपरेषेची यादी आपणास पाठविली. त्याप्रमाणे आपण ही स्पर्धा आयोजित केली. नेरूर गाव हा कलेचा देव कलेश्वर यांचा गाव असल्याने या स्पर्धेचा फायदा गावातील लोकांना होईल.नेरूर गावातील कलाकार आपली कला संस्कृती साता समुद्रापार घेऊन जातील असे गौरवोद्गार उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांनी काढले.
परीक्षक म्हणून प्रशांत धोंड सर आणि रुपेश नेवगी सर यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले. या संपूर्ण स्पर्धेसाठी युट्युब च्या माध्यमातून चित्रीकरण नेरूर गावचे सुपुत्र जयवंत मेस्त्री यांनी केले. या स्पर्धेसाठी साउंड सिस्टीम विजय नेरुरकर यांची तर लाईट सिस्टम वृषभ वाघ यांची होती.
यावेळी व्यासपीठावर रणझुंजार मित्र मंडळाचे सर्वेसर्वा उद्योजक रुपेश पावसकर, नेरूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर,देवस्थान स्थानिक सल्लागार कमिटी अध्यक्ष तथा माजी सरपंच चारुदत्त देसाई, माजी सरपंच शेखर गावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक दाजी गावडे, बाळा घाडी,अशोक पावसकर, आजीम मुजावर, यशस्वी उद्योजिका सौ. रुद्रा रुपेश पावसकर, ओम शिव कृपा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गिरीश नेरुरकर ग्रामपंचायत सदस्य समीर नाईक ग्रामपंचायत सदस्य संतोष कुडाळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नेरूरकर, ग्रामपंचायत सदस्य उमेश परब, संतोष परब, विलास मेस्त्री, सौरभ पाटकर, पियो खतीप, रिक्षा युनियन जेष्ठ सदस्य चंद्रकांत पाटकर मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते सुधीर नेरूरकर, कल्पेश मार्गी, आनंद नेरुरकर, नरेश नेरुरकर, प्रभात वालावलकर, कृष्णा उर्फ गोट्या पाटकर, संतोष परब, सतीश सावंत, अमोल श्रृंगारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान त्याचप्रमाणे बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी बैल सजावट स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा श्री देव कलेश्वर मंदिर ते नेरूर चव्हाटा अशी रंगणार आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रणझुंजार मित्रमंडळ व उद्योजक रुपेश पावसकर यांनी केले आहे.





