सर्व सुविधांनी सुसज्ज “अलंकार मंगल कार्यालय” चा उद्या 24 ऑक्टोबर रोजी शुभारंभ

प्रशस्त पार्किंग, एसी बँक्वेट हॉल, जनरेटर बॅकअप व मुबलक मोकळी जागा या सहीत अनेक सुविधा एकाच जागी

शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे समीर नलावडे व कुटुंबीयांचे आवाहन

बुकिंग साठी संपर्क क्रमांक जाहीर

कणकवली शहरापासून हाकेच्या अंतरावर प्रशस्त जागेत व रस्त्याला लागूनच असलेल्या “अलंकार मंगल कार्यालय” चा शुभारंभ 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. जानवली येथील सावडाव तरंदळे रोड वरील गणेश मंदिर व माती रिसॉर्ट जवळ हे अलंकार मंगल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कणकवली तालुक्यातील जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईड च्या मागील रस्त्याने काही अंतर गेल्यावर हे प्रशस्त असे अलंकार मंगल कार्यालय साकार झाले आहे. या मंगल कार्यालयामध्ये साखरपुडा, लग्न, वाढदिवस यासह अन्य विविध समारंभ प्रशस्त जागेमध्ये करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. प्रशस्त एसी बँक्वेट हॉल, मुबलक पार्किंगची सुविधा, व्हीआयपी लाउंज, मोठ्या समारंभाला पुरेसा असा जनरेटर बॅकअप, बुफे सिस्टीम जेवण, जेवणासाठी व समारंभासाठी अनुभवी मॅनेजमेंट टीम यासह अन्य अनेक सुविधा व आकर्षक सजावट या सर्व सोयीने सुसज्ज असलेले हे मंगल कार्यालय जनतेच्या सेवेत शुक्रवार 24 ऑक्टोबर पासून रुजू होणार आहे. कोणत्याही समारंभासाठी या मंगल कार्यालयाचे बुकिंग सुरू करण्यात आले असून, याकरिता संपर्क क्रमांक देखील जाहीर करण्यात आले आहेत. “इव्हेंट कुठलाही असू दे, त्यासाठी निवड ही फक्त अलंकार मंगल कार्यालयाचीच” अशी टॅगलाईन घेत हे अलंकार मंगल कार्यालय नव्या दिमाखदार रूपात सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेकरीता दाखल होत आहे. यानिमित्ताने सकाळी 11 वाजता सत्यनारायणाची महापूजा व त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या सर्व शुभारंभ सोहळ्याला व महाप्रसादाला उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, सुप्रिया समीर नलावडे व राज समीर नलावडे यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9403919966 व 9403929966 तसेच 9420206464 व 9422070340 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!