नीलेश राणे यांचा वैभव नाईक यांना टोला

मला विधानसभेचे तिकीट मिळणार की नाही याचे टेन्शन वैभव नाईकांना जास्त – नीलेश राणे
मालवण, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे काम एका आमदाराने कसे करावे हे मी वैभव नाईक यांना दाखवून देत आहे. त्यातून जर ते काही शिकत असतील तर आनंद आहे, असा मार्मिक टोला भाजप नेते नीलेश राणे यांनी लगावला. राणे म्हणाले, मला विधानसभेचे तिकीट मिळणार की नाही याचे टेन्शन वैभव नाईकांना जास्त आलेले दिसते. रोज उठून माझा सोशल मीडिया आणि कामाचा पाठलाग करणे आणि दोन-तीन पदाधिकाऱ्यांना टीका करायला पगारावर ठेवणे. याचा अर्थ वैभव नाईक मला घाबरले आहेत असे मी म्हणणार नाही, पण ती भीती ते त्यांच्या कृतीतून दाखवत आहेत. मी कुडाळ-मालवण मतदारसंघांचे काम एका आमदाराने कसे करावे है त्यांना दाखवून देत आहे. त्यातून ते जर काहीं शिकत असतील तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे, असे नीलेश राणे म्हणाले.





