विजवाहिन्या तुटून अंगावर पडल्यामुळे तेर्सेबांबर्डे येथे म्हैस जागीच ठार

विजवाहिन्या तुटून अंगावर पडल्यामुळे तेर्सेबांबर्डे येथे १ म्हैस जागीच ठार झाली तर १ अत्यवस्थ आहे. हा प्रकार काल २७ जून सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडला. यात शेतकरी प्रशांत मनोहर गवळी (रा. आडेली) यांचे लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच विज कंपनीचे सहाय्यक अभियंता विनोद वाठोरे व त्यांचे सहकारी देवू जाधव यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. संबंधित घटनेचा पंचमाना करण्यात आला असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवू, असे त्यांनी सांगितले





