हळवल येथील वनिता पाडावे यांचे निधन

हळवल येथील रहिवासी वनिता तुकाराम पाडावे ( वय 65 रा. हळवल पिंपळवाडी ) यांचे गुरुवार दिनांक 27 जून रोजी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. कै पाडावे ह्या मनमिळावू आणि सुस्वभावी म्हणून हळवल गावात परिचित होत्या त्यांच्या जाण्याने हळवल गावात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे हळवल ग्रामपंचायत कर्मचारी अनिल पाडावे यांच्या त्या मातोश्री होत. कै वनिता पाडावे यांच्यावर हळवल गावातील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कणकवली प्रतिनिधी





