महिला दिनानिमित्त कुडाळात ४ मार्चला पाककला स्पर्धा

सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ, कुडाळ यांचे आयोजन
पहिल्या ३० स्पर्धकांना प्राधान्य
निलेश जोशी । कुडाळ : सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ, कुडाळ यांच्या वतीने ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या ४ मार्च २०२३ रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्या ३० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल असे आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पाककला स्पर्धेसाठी मका (भरड धान्य) हा विषय ठेवण्यात आला आहे. मराठा समाज सभागृह एसी हॉल समोर दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत हि पाककला स्पर्धा होणार आहे. यासाठी 8275632564 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर मजेदार खेळ घेण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धकांची सर्व सर्व बक्षिसे ८ मार्च २०२३ रोजी मराठा समाज हॉल येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात देण्यात येणार आहे. तरी सर्व महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेउन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सौ अदिती अनिल सावंत, अध्यक्ष भगिनी मंडळ कुडाळ यांनी केले आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.