द सेंट्रल रेल्वे तिकिट चेकिंग स्टाफ वेल्फेयर ट्रस्ट मुंबई तर्फे जामसर शाळेतील मुलांना सायकल वाटप
TCRTCSW ट्रस्ट तर्फे जागतिक मराठी भाषा दिनचे औचित्य साधून सोमवार दिनांक २७/२/२०२३ रोजी जामसर विभाग हायस्कूल जामसर,ता. जव्हार , जि. पालघर या आदिवासी विभागातील शाळेत जावून ट्रस्ट तर्फे मोफत २५ सायकली जे विद्यार्थी/विद्यार्थिनी दूरून चालत शाळेत येतात. त्यांना शाळेत येणे सोयीस्कर होण्यासाठी अश्या मुलांना वाटप करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांकडे शाळेचा गणवेश नव्हता अश्या १० विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश वाटप करण्यात आले. तसेच काही विद्यार्थी अनवाणी शाळेत येत होते अशांना चप्पल वाटप करण्यात आले.
या वर्षी दहावीच्या परीक्षेत बसणार्या मुलांना परीक्षेत उपयुक्त शालेय साहित्य 30 विद्यार्थी/विद्यार्थिनीना वाटप करण्यात आले. त्यात पेपर लिहिण्याचे पॅड, पेन, पेन्सिल, रबर व स्वामी विवेकानंद महाराज यांचे पुस्तक वाटप करून त्यांनी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिलेत. शाळेतील इतर मुलांनाही शालेय वस्तू व स्वामी विवेकानंद महाराज यांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
जामसर हायस्कूल तर्फे सदर कार्यक्रमाबरोबर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व शालेय स्पर्धा विजेत्यांचा सत्कारही आयोजित केला होता. जामसर हायस्कूलचे चेअरमन श्री विठ्ठलजी थेतले साहेब, मुख्याध्यापक श्री. एस. बी. सुरोशी सर, शालेय सदस्या पटेकर ताई, समाजसेविका अलका मेटकर ताई व शिक्षक सोनवणे, आरज ,कुवरा, चौधरी उपस्थित होते.
TCRTCSW ट्रस्टचे अध्यक्ष सुहास जोशी, उपाध्यक्ष हरिश्चंद्र मोंडकर, सचिव डि व्ही चिंदरकर, सहसचिव अभय कांबळे, खजिनदार गिरिश कदम, ट्रस्टी लीना गोरडे, बाला पिल्ले, सक्रिय सदस्य व विक्रमगडचे सुपुत्र सुनील सांबरे यांच्या उपस्थित सदर वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमसाठी आशिष हलपतराव, राहुल व सतीश भानुशाली, ट्रस्टी शेखर तांबे यांचे विशेष सहकार्य मिळाले. ट्रस्टी अभय कांबळे यांची संकल्पना. सोसायटी मध्ये वापरात नसलेल्या सायकली जमा करून ट्रस्ट मार्फ़त त्यांना दुरुस्ती करून गरजू मुलांपर्यंत पोहोचविणे. मुंबई सकाळने त्याला प्रसिद्धी दिली व प्रत्यक्षात योजना राबवली. त्यासाठी ट्रस्टचे माजी सचिव श्री. डी. डी. फडणवीस साहेब, ट्रस्टचे माजी खजिनदार श्री एस बी साने साहेब विविध सोसायटी यांचे सहकार्य मिळाले व अजूनही मिळत आहे.