महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव रद्द करा !
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कुडाळ यांच्याकडून महावितरणला निवेदन, ऊर्जामंत्र्यांना सुद्धा पत्रव्यवहार
कुडाळ : राज्यातील प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महावितरण कंपनी आणि तहसीलदार यांना वीज दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आले. महावितरण कंपनीने ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला असून या विरोधात राज्याचे वीज ग्राहक संघटना अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले. कुडाळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना याचे निवेदन देण्यात आले. तसेच याची प्रत सुद्धा राज्याचे ऊर्जामंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आली.
यावेळी जिलह वीज ग्राहक संघटना उपाध्यक्ष श्रीराम शिरसाट, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय भोगटे, विलास तेली, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, अवधूत शिरसाट, गोविंद सावंत, प्रकाश सावंत, अभिषेक वेंगुर्लेकर, जयराम डिगसकर, महेश ओटवणेकर, गोपीचंद सावंत, संदेश गोसावी आदी उपस्थित होते.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ