वेताळ बांबर्डेमध्ये महिला दिन उत्साहात

वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतने केले होते आयोजन
कुडाळ : वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतच्या वतीने आज
८ मार्च २०२३ म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा वेताळ बांबर्डे येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यांचा शुभारंभ एकलव्य ज्ञान पुण्याच्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वेताळ बांबर्डे गावच्या सरपंच वेदिका दळवी, एडवोकेट प्रणाली घाडी, एडवोकेट दिपाली भोगले, स्नेहा दळवी यांच्यासह वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत कर्मचारी वृंद
आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्यात रांगोळी, पाककला स्पर्धा आणि फनी गेम्स, डान्स यांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला तसेच बच्चे कंपनीने सुद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. ”झिंगाट” गाण्यावर सर्वच महिलांनी ताल धरून कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. तसेच दुपारी स्नेहभोजनाचा सर्व महिला वर्गाने आस्वाद घेतला.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ