वानराच्या मर्कटलिलांनी जामडूलवासिय हैराण

तातडीने बंदोबस्त करण्याची आचरा ग्रामपंचायत कडे मागणी

मागील चार ते पाच दिवसांपासून एका वानराने आचरा जामडूल वाडीत आपल्या मर्कट लिलांनी हैदोस घातला आहे. घरासमोर उभ्या केलेल्या गाड्यांचे आरसे आणि वायफर तोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. हा एकच वानर हे कृत्य का करत आहे असा प्रश्न जामडूल वासियांना पडला असून याबाबत तातडीने उपाययोजना करत वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी जामडूल ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे आचरा ग्रामपंचायत कडे केली आहे.
याबाबत जामडूल पोलीस पाटील अमोल पेडणेकर यांनी आचरा ग्रामपंचायत मध्ये दिलेल्या निवेदनात गेले चार-पाच दिवस आचरा जामडूल येथे एका वानराने चार-पाच गाड्यांचे आरसे व वायफर तोडून थैमान घातले आहे. यामध्ये कृष्णा तारकर यांच्या रुग्णवाहिकेचा आरसा व वायफर, फरहान मुजावर यांच्या चार चाकी गाडीचे दोन्ही आरसे , तसेच ओम प्रकाश आचरेकर यांच्या चार चाकी गाडीचा एक आरसा, डिवाईन फर्नांडिस यांच्या दोनचाकी गाडीचा आरसा अशा चार ते पाच गाड्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा वानर स्वतःचे प्रतिबिंब बघण्याच्या हेतूने आरसे तोडत असेल तर तो एकच वानर हे कृत्य का करत आहे असं प्रश्न जमल ग्रामस्थांना पडला आहे. नक्की तो वानर प्रतिबंध बघण्याच्या हेतूने एक नृत्य करत आहे की तू पिसाळला आहे याचा शोध घेण्याकरता ग्रामपंचायत अत्रे यांनी वनकर्त्याकडे तातडीने तक्रार करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!