आचरा पारवाडी नेत्र तपासणी शिबीरात शंभरहून जास्त रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

श्री ब्राह्मण देव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे पारवाडी, देवगड मेडिकल फाउंडेशन, डॉ आठवले कॅम्पस देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
आचरा पारवाडी येथे श्री ब्राह्मण देव मंदिर हरीनाम सप्ताहाचे औचित्य साधत आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात शंभरहून अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. सदर शिबीर
श्री ब्राह्मण देव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे पारवाडी, देवगड मेडिकल फाउंडेशन, डॉ आठवले कॅम्पस देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच जेरोन फर्नांडिस तसेच रोहित कावले, राजन आचरेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते.
हे शिबिराचे उद्घाटन आचरा
सरपंच जेरोंन फर्नांडीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी
उपसरपंच संतोष मिराशी ,रामेश्वर देवस्थान समिती
उपाध्यक्ष संजय मिराशी. कपिल गुरव
श्री ब्राह्मण देव सांस्कृतिक विकास मंडळाचे
अध्यक्ष मुकेश सावंत,
उपाध्यक्ष प्रदीप केळकर
सचिव चंदू कदम
खजिनदार स्वप्नील भाटकर यांसह पारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
ह्या शिबिरात 100 हून अधिक या रुग्णांची मोफत तपासणीत रुग्ण तपासणीकरण्यासाठी दशरथ हक्के राकेश कोंयंडे यांनी सहभाग घेतला.
या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या मोतीबिंदूंच्या रुग्णांना विशेष सवलतीत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
नॅब आय हॉस्पिटल देवगड डॉक्टर आठवले कॅम्पस तर्फे सुमारे 50000 रुग्णांची मोफत नेत्ररोग चिकित्सा तपासणी करण्यात आली आहे.
तसेच बिन टाक्याची इंजेक्शन विरहित मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सर्वाधिक प्रमाणात देवगड येथे नॅब आय हॉस्पिटल तर्फे करण्यात आली असल्याची माहिती राजन आचरेकर यांनी दिली.





