नेरूर येथे अपघात, तिघे जखमी

कुडाळ : नेरूर येथील इंग्लिश मीडियम स्कूलनजीक काल सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झालेत. नेरूर-वालावल रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने दगड (चिरे) डंपिंग केले होते. त्यामुळेच हा अपघात घडला. नेरूर देसाईवाडीतील रवींद्र लक्ष्मण परब (वय ३२), साहिल महादेव नाईक ( वय १६) हे दोघेही नेरूरवरून जकात नाका मार्गाने प्रवास करत होते. या अपघातानंतर अवघ्या ५ मिनिटात नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर देवस्थानचे क्लार्क विजय दाभोलकर (वय ६०) हे कलेश्वर मंदिरकडून आपल्या घरी सायकलने जात होते. हे तिघेही जण लाकूड गिरणीच्या पुढे मंदार म्हाडगुत दुकान दरम्यान आले असता त्या ठिकाणी दुकानासमोर चिरे (दगड) अज्ञात व्यक्तीने चक्क रस्त्यावरती डम्पिंग केल्यामुळे अपघात घडला. जखमींना ग्रामीण रुग्णालय कुडाळ या ठिकाणी नेण्यात आले. तर अधिक उपचारासाठी डॉ. नवांगुळ यांच्याकडे दाखल करण्यात आले. या अपघातातील तीनही जखमींची प्रकृती ठीक आहे.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!