गॅस दरवाढीविरोधात उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून हल्लाबोल !

कुडाळमध्ये केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
कुडाळ : केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घरगुती गॅस दरवाढीविरोधात कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे गॅस आणून दगडी चुलीवर भाकरी बनवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र तसेच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत एकच हल्लाबोल करण्यात आला. ‘या सरकारचं करायचं काय ? खाली डोके वर पाय’, केंद्र सरकारचा निषेध असो, घरगुती गॅसच्या किमती कमी करा, अन्यथा खुर्ची खाली करा ‘ अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली, पण गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून ठेवल्यात. यामुळे महिला वर्गात नाराजी असून याला प्रत्युत्तर नक्कीच निवडणुकीत देणार, असे प्रत्युत्तर संजय पडते यांनी देताना म्हटले. आंदोलन ठिकाणी दगडी चुलीवर भाकरी बनवून बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, संजय गांधी निराधार योजना माजी अध्यक्ष अतुल बंगे, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, ओबीसी सेल तालुकाप्रमुख बंड्या खोत, युवासेना शहरप्रमुख संदीप महाडेश्वर, उपशहरप्रमुख गुरुनाथ गडकर, समन्वयक अमित राणे, आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण, नगरसेविका ज्योती जळवी, कुडाळ-मालवण महिला आघाडी संघटक श्रेया परब, तालुका संघटक स्नेहा दळवी, तालुका संघटक मथुरा राऊळ, पावशी सरपंच वैशाली पावसकर, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेवक उदय मांजरेकर, विभागप्रमुख गुरू सडवेलकर, बंड्या कोरगावकर, नितीन सावंत, बाळा वेंगुर्लेकर, बाळू पालव, मंगेश बांदेकर, बाळ धुरी, विभागप्रमुख दीपक आंगणे, सतीश कुडाळकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

