अशोक दाभोलकर राष्ट्रीय लोकसेवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित!

मसुरे : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचे सुपुत्र तथा फेडरेशन रेफरी व क्रीडा समिक्षक व मार्गदर्शक श्री. अशोक दाभोलकर-मेस्री याना राष्ट्रीय लोकसेवा जीवन गौरव सन्मान २०२३ या पुरस्काराने पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलताई परुळेकर तसेच वात्सल्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा परब ह्यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन नुकतेच कुडाळ येथे सन्मानित करण्यात आले.
वात्सल्य सामाजिक संस्था व निर्धार न्यूज लोकसेवा फाऊंडेशन महाराष्ट्र आयोजित मराठी राज्यभाषा दिन व छत्रपती शिवराय जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवराय संमेलन, कुडाळ २०२३ कार्यक्रमात दाभोलकर याना सन्मानित करण्यात आले. अशोक दाभोलकर यांनी क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक शुटिंगबाॅल खेळाच्या प्रसारासाठी मातृभाषा मराठी लिखाणातून फेसबुक माध्यमाव्दारे महाराष्ट्रात जनजागृती व प्रचार तसेच महाराष्ट्र व सिंधुदुर्ग जिल्हातील जि.प.पू.प्रा.मराठी शाळांमधून पालक व पाल्यांमध्ये चर्चासत्र राबवत खेळ व शिक्षणाचे महत्व पटवून देताना घेतलेल्या परिश्रमाची दखल घेत त्यानी दिलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल सदर पुरस्कार देण्यात आला. यावेळी समृध्दी प्रकाशनने संस्थापक प्रा. बी, एन. खरात, सौ. खरात, वात्सल्य सामाजिक संस्थेच्या सौ. नेहा परब, संचालक श्री. परेश राऊत तसेच त्यांच्या सर्व सदस्यानी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.