व्हिडिओ गेम धारकां कडून 15 लाखाच्या खंडणीची मागणी

व्हायरल ऑडिओ क्लिप नुसार गुन्हा दाखल करा

माजी आमदार परशुराम उपरकर यांची पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओ गेम परवाना खेळाअंतर्गत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व व्हिडिओ गेमच्या ठिकाणी जुगार किंवा परवान्याच्या नियमात नसलेले जुगारचे गेम व्हिडिओ गेमच्या नावाखाली खेळले जातात. सदर परवाना हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ज्या नियमात दिला जातो त्या नियमात ते खेळले जात नाहीत. त्या ठिकाणी अवैध जुगार चालू असतो, याची तपासणी करुन कारवाई करणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवैध व्हिडिओ गेमबाबत एक तक्रार दाखल झाली आहे.
त्या पोलीस विभागाकडून कुडाळ तालुक्यातील काही व्हिडिओ गेम परवाने रद्द करण्यात आले, असे समजते. सदर तक्रारदार यांनी या तक्रारी केल्यानंतर काही कारवाई झाल्यानंतर व्हिडिओ गेमच्या मालकांकडून मोठ्या प्रमाणात १५ लाखांची खंडणी मागितली आहे. अशी तक्रार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यासोबत व्हायरल ऑडिओ क्लिप देखील त्यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना तसेच माध्यमाना पाठवली आहे. या तक्रारीत उपरकर यांनी म्हटले आहे, या बावत व्हिडिओ गेम परवानगीधारक यांनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. व व्हिडिओ गेम परवानाधारकांकडून जे पैसे मागितले गेले त्यात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराकडून फोन संभाषण सांगितलेले दिसते. कारण याबाबत सोमवारी दिनांक ०३/०५/ २०२४ रोजी रात्री ११.३० दरम्यान ऑडियो क्लिप व्हायरल झालेली ती क्लिप आपणाकडे आपल्या भ्रमणध्वनीवर पाठवलेली आहे. त्या क्लिपवरुन तक्रारदार व्हिडिओ गेम धारकांकडून १५ लाख मागणी करत असल्याचे ऐकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभाग यांना व्हिडिओ गेम अतंर्गत कसा जुगार खेळला जातो याची माहिती कळणार नाही. व्हिडिओ गेमद्वारे जुगार खेळला जातो. त्याची मेक तक्रारदाराला माहिती असल्याचे क्लिप संभाषणामध्ये बोलले गेलेले आहे. व प्रशासन सदर व्हिडिओ गेम बंद करु शकत नाही ते व्हिडिओ गेम मी एकटा बंद करु शकतो, असे संभाषणामध्ये म्हटलेले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व्हिडिओ गेमची अचानक तांत्रिक तपासणी करुन त्यावर कारवाई करण्यात यावी. जर व्हिडिओ गेम खेळाअंतर्गत खेळ म्हणून खेळले जात असतील तर त्या व्हिडिओ गेमवर कारवाई न करता
तांत्रिक पद्धतीने जुगार किंवा खेळाडूंची लूट ऑनलाईन पद्धतीने जुगार खेळून व्हिडिओ गेम अंतर्गत खेळून आर्थिक लूट करुन अवैध खेळ खेळला जात असेल तर त्या परवानाधारकाचा परवाना रद्द करुन त्यांच्यावर कारवाई करावी. सदर कारवाई करताना महसूल विभाग, पोलीसांचे सायबर क्राईम विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई केल्यास आणि संभाषणातील कोणत्या कारणामुळे १५ लाख रुपयांची तक्रारदार मागणी करत होते, हे समजेल. त्याचप्रमाणे सदर तक्रारदारावरती सदर संभाषणाबाबत कारवाई करुन खंडणीसारखा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!