ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा.
कणकवली/मयुर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला.
पृथ्वीचे वाढते तापमान आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल याला प्रतिबंध व्हावा या हेतूने पर्यावरण दिनाच्या औचीत्याने प्रशालेच्या आवारात विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला आयडीयलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे ,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,सचिव श्री.हरिभाऊ भिसे,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सहसचिव श्री.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.