लोकसभा निवडणूक निकाल नंतर शिवसेना शिंदे गटाला भाजपकडून धक्का

शिवसेना पुरस्कृत खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपात पक्षप्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विकास कामांना न्याय मिळण्याचा व्यक्त केला विश्वास
खारेपाटण गावच्या सरपंच प्राची देवानंद इस्वलकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. प्राची इस्वलकर ह्या शिवसेना शिंदे गट पुरस्कृत खारेपाटण सरपंचपदी निवडून आल्या होत्या. खारेपाटण गावविकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्वाचे आहे. आमदार नितेश राणे यांची कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच इस्वलकर यांनी सांगितले. ओम गणेशवर झालेल्या पक्षप्रवेशावेळी भाजपचे माजी जि. प. सभापती बाळा जठार, माजी पं स सभापती दिलीप तळेकर, माजी पं स सदस्य तृप्ती माळवदे, शक्तीकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, राजू वरुणकर , सुधीर कुबल, भाऊ राणे, अंजली कुबल, रफिक नाईक आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी