विशाल परबांच्या माध्यमातून सावंतवाडी बाजारपेठेत छत्र्यांचे वाटप…

राणेंच्या विजयोत्सवानिमित्त खास भेट
सावंतवाडी,- नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदार संघातील ५ हजार विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे. आज सावंतवाडी शहरातील तब्बल दोनशे व्यापाऱ्यांना या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित विक्रेत्यांनी श्री. परब यांच्या उपक्रमाचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आरवडेकर, उत्कर्षा रासोलकर, भाजपा सरचिटणीस विनोद सावंत, केतन आजगावकर, अमित गवंडकर, अमित परब, गणेश कुडव, सागर मठकर, शक्ति केंद्रप्रमुख बंटी जामदार, मंदार पिळवणकर, अजय सावंत आदी उपस्थित होते.