सावंतवाडी(प्रतीनिधी)

    सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाली असून ही मंजूर करण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती

ही मशीन  कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून मंजूर करण्यात आली महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा मशिने कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे येथील लावण्यात आलेले आहे आता गरीब   रुग्णांना याचा मोफत लाभ मिळणार आहे लवकरच या मशनरीचे उद्घाटन आचारसंहिता संपल्यानंतर याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे या मशीनरीची एडवोकेट बाबा तंगसाळी सुनील कोरगावकर तसेच जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी पाहणी करून विचार विनिमय केला

error: Content is protected !!