कलमठ ग्रामपंचायत वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान

संत गाडगे बाबांना अभिवादन
कलमठ ग्रामपंचायत वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. आपल्या गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मध्ये पुरस्कार मिळाला, त्यामुळे संत गाडगेबाबा जयंती साजरी करत असताना कलमठ बाजारपेठ शाळा येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. जगाला ग्रामस्वच्छतेचा संदेश आणि महत्व निर्माण करून, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून चळवळ निर्माण करणार्या महान व्यक्तिमत्त्व असणाऱ्या महापुरुषांच्या जयंतीला स्वच्छता अभियान राबवून खरे अभिवादन असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यानी सांगितले. या उपक्रमाला जिल्हापरिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरू वर्देकर , ग्रामपंचायत अधिकारी प्रविण कुडतरकर, मुख्याध्यापक मधुरा सावंत, सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, स्वाती नारकर, प्रमोद पवार, विद्या लोकरे, इंदू डगरे, सुप्रिया देसा, एकता फाटक, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा कीर्ती मेस्त्री, वैदेही खरात, पूजा हुन्नरे, शुभांगी सावंत, साक्षी राडये, मधुरा परब, ज्योती जाधव, वसंत सावंत, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, जयेश मेस्त्री आणि विद्यार्थी उपस्थित होते.





