शिष्यवृत्ती परीक्षार्थींना परमहंस भालचंद्र महाराज संस्थानतर्फे खाऊ वाटप

१९८२ पासूनची परंपरा कायम; विद्यार्थ्यांना दिला प्रोत्साहनाचा हात
कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल व एस. एम. हायस्कूल या परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना परमहंस भालचंद्र महाराज संस्थान यांच्या वतीने बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
परीक्षेच्या तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व दिलासा मिळावा या उद्देशाने संस्थानने हा उपक्रम राबविला. संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर यांनी बिस्कीट पुडे, प्रेरणा मांजरेकर, ए. डी. राणे, सूर्यकांत चव्हाण व लक्ष्मण वळवी यांच्याकडे सुपूर्त केले.
सन १९८२ पासून शिष्यवृत्ती परीक्षार्थींना खाऊ वाटप करण्याची परंपरा संस्थानने अखंडपणे जपली आहे. गेली चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत संस्थान सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.
याप्रसंगी शैक्षणिक सल्लागार शरद हिंदळेकर, शैक्षणिक मंडळ सदस्य सुहास आरोलकर, मंगेश तेली, सदानंद गावकर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्थानकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





